Breaking News : छोटा रावणला अटक

एमपीसी न्यूज – छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सरफराज शेख उर्फ छोटा रावण, (वय 25, रा.कासरवाडी) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी अटक केले आहे.आरोपी छोटा रावण हा चार गुन्ह्यात  पोलिसांना हवा होता.

2021 मधील दरोड्याचा गुन्हा व 2018 मधील मारहाणीचा गुन्ह्यामध्ये तो पिंपरी पोलिस ठाण्याला पाहिजे होता.2022 मधील मारहानीच्या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे होता.तसेच 2020 मधील कार चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो देहूरोड पोलीस ठाण्याला पाहिजे होता.

तसेच त्याच्यावरती यापूर्वी 25 ते 26 गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.त्याची तडीपारीची मुदत 25 ऑगस्टला संपली होती.

गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक इमरान शेख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस हवालदार फारूक मुल्ला, पोलीस नाईक प्रमोद हिरळकर, पोलीस नाईक मारुती जायभाय, पोलीस नाईक विशाल भोईटे, पोलीस नाईक उमाकांत सरोदे यांनी केली आहे.

आज त्याला पिंपरी कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.