Chichwad : महिलेच्या पर्समधून 58 हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सुमारे 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली.

उज्वला कुणाल ओव्हाळ (वय 29, रा. रस्टन कॉलनी, चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उज्वला या खरेदीसाठी गांधीपेठ, चिंचवडगाव येथे आल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून आतील सुमारे 54 हजारांचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख चार हजार रुपये असा एकूण 58 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार मारूती कडू करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.