Chinchwad : जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना शहरात बंदी

एमपीसी न्यूज – जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरवणारी व वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करण्यास तसेच वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. ही बंदी मंगळवार (दि. 24) पहाटे 5 ते मंगळवार (दि 31) रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यभर ठीकठिकाणी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) (3) नुसार जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरे लॉकडाऊन आणि  संचारबंदीचे देखील आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पिंपरी-चिंचवड शहरात अनावश्यक वाहतूक व गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरवणारी व वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असल्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक वाहतुकीची सर्व वाहने (पीएमपीएमएल सह) प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या सर्व आंतरराज्य व राज्य अंतर्गत बसेस, प्रवासी वाहतूक सेवा पुरवणार्‍या सर्व खाजगी वाहनांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई आहे.

कोणत्याही व्यक्तीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी आणि गल्लीत सायकल, मोटार सायकल, स्कूटर आदी सर्व प्रकारची वाहतूक करणारी तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वाहने, जड व अवजड वाहने यांची वाहतूक आणि त्यामधून प्रवास करण्यास मनाई आहे.

दरम्यान खालील सेवा सुरू राहतील –

# पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित (फक्त कर्तव्याअर्थ)

# तातडीची रुग्ण वाहतूक व हॉस्पिटल मधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ आरोग्यसेवा (फक्त कर्तव्यार्थ)

# तात्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना व प्रवाशांना

# अत्यावश्यक सेवा उदा वीज, पाणीपुरवठा, दूरसंचार, अग्नीशमन, बँक व एटीएम, विमा, इन्शुरन्स, फिनटेक सर्विसेस आणि संबंधित सेवा, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया, आयटी आणि आयटी ईएस टेलिकॉम सेवा पोस्टल इंटरनेट आणि डाटा सर्विसेस संबंधित उद्योग  – क्रिटीकल नेशन इन्फ्रास्ट्रक्चर (फक्त कर्तव्यार्थ व तातडीचे असल्यास)

# जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणारे तसेच जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने (चालक अधिक एक व्यक्ती)

# शेतमाल व शेती मालाशी संबंधित उत्पादने यांची आयात व निर्यात

# ई-कॉमर्स वाहतुकी अंतर्गत अत्यावश्यक माल त्यामध्ये फार्मासिटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणे

# खाद्यपदार्थ विक्री किराणा माल, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे यांची वाहतूक आणि गोदाममापर्यंत व गोदामापासूनची वाहतूक

# बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीच्या पशुवैद्यकीय अस्थापना# रेस्टॉरंटमध्ये बनवलेले खाद्यपदार्थ टेक अवे आणि होम डिलिव्हरीसाठी पार्सल पद्धतीने

# दवाखाने, औषधालये, चष्मा दुकाने, फार्मासिटिकल्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यांचे वितरक यांना वाहतुकीसाठी

# पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑइल एजन्सी आणि त्यांची गोदामे आणि तत्सम वाहतूक

# अत्यावश्यक सेवा सुरक्षा आणि सेवा सुविधा पुरविणाऱ्या संस्था

# कोव्हिड -19ला  प्रतिबंध करण्यासाठी अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्या खाजगी अस्थापना

# प्रसार माध्यमे व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कर्तव्यार्थ)# वर नमूद उल्लेख केलेल्या अत्यावश्यक सेवांची पुरवठा करणारी साखळी

# परवाना प्राप्त टॅक्सी त्यामध्ये एक चालक अधिक दोन प्रवासी तसेच परवाना प्राप्त ऑटोरिक्षा त्यामध्ये एक चालक अधिक एक प्रवासी यांना

फक्त अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक व प्रवासी वाहतूक करता येईलवर नमूद केलेले व सवलत दिलेले अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यांच्यासाठी दिलेले ओळखपत्र व विशेष कार्यासाठी नेमणुकी बाबतचे आदेश, तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे आणि प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.