Chichwad : काव्यानंद प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स द्वारा आयोजित पुरस्कार वितरण समारंभ, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे कवी संमेलन (Chichwad)  प्रतिभा महाविद्यालय सभागृह चिंचवड स्टेशन पुणे येथे संपन्न झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नेरूळ येथील ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, संत चित्रकार वि.ग सातपुते होते.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित ज्येष्ठ कथाकार नागेश शेवाळकर आणि व्यासपीठाच्या संचालिका ज्योती जाधव हलगेकर होत्या. कवयित्री वाणी ताकवणे यांनी गणेश वंदना आणि भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली. ‘चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार 2022’ मुंबई येथील कवयित्री रूपाली चेऊलकर यांना ‘दरवळ’ या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. ‘निर्मलादेवी खंडेलवाल स्मृती काव्य सन्मान 2022’ पुणे येथील कवयित्री वाणी ताकवणे यांना त्यांच्या ‘आरंभ’ या हिंदी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला.

NCP : महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ  राष्ट्रवादीचे आंदोलन

नागपूर येथील कवयित्री सुनिता गायकवाड यांच्या ‘मनातल्या पानातून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. लेखिका वंदना ताम्हाणे यांच्या ‘आम्ही बोलतोय’ या लेख संग्रहाचे प्रकाशन झाले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौंड येथील प्रमोद कबनुरकर, प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अमिता देशपांडे, काव्यानंदचे कोषाध्यक्ष अमोल शेळके, वंश खंडेलवाल, स्वाती खंडेलवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी यांचे संमेलन संपन्न झाले. बाबू डिसोझा, संगीता काळभोर, यशवंत देव, भाग्यश्री मोडक, मनीषा पाटील, वंदना ताम्हाणे, अंजली नवांगुल, सुनिता बोडस, ज्योती जाधव हलगेकर, सुनिता गायकवाड , रुपाली चेऊलकर, वाणी ताकवणे ,रामचंद्र किल्लेदार , संजय जगताप तुकाराम डोके,दिपाली पवार , सुहास घुमरे,चैतन्य काळे, विवेकानंद पोटे, सीमा गांधी , सुनिल खंडेलवाल, वि.ग.सातपुते यांनी आपल्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाला लेखिका माधुरी डिसोजा, कबनूरकर कुटुंबिय, तसेच अनेक रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव विवेकानंद पोटे यांनी (Chichwad)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.