Chichwad : आंतरराष्ट्रीय भुअलंकरण (रांगोळी) दिन साजरा

संस्कार भारती पिंपरी-चिंचवड आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय भुअलंकरण दिन (रांगोळी) निम्मिताने जिजाऊ पर्यटन केंद्र, महान साधू मोरया गोसावी समाधी मंदिर चिंचवडगाव येथे साजरा केला.

यावेळी अखिल भारतीय भू-अलंकरण समिती चे अध्यक्ष व पुण्यातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार रघुराज देशपांडे, ब प्रभाग अध्यक्षा, नगरसेविका करूणा शेखर चिंचवडे, निलम चिंचवडे, पर्यावरण मित्र धनंजय शेडबाळे, राजीव भावसार, सोमनाथ आबा मसूडगे, राजकुमार खराडे, वैशाली खराडे, स्वाती प्रदीप वाल्हेकर, संदीप पोपटराव वाल्हेकर, तसेच संस्कार भारती पिंपरी-चिंचवडचे सचिव हर्षद कुलकर्णी, रांगोळी विधा प्रमुख मधुरा ओतारी, मासिक विधा प्रमुख अनिता रोकडे व सहकारी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे सदस्य, रान जाई प्रकल्प देहूचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजची पवनामाई आरती यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या आणि रांगोळीच्या सर्व कलाकारांचे आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.