Chichwad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेला मुलगी झाल्याने तिचा छळ करण्यात आला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 29 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आक्रम मेहबूब अत्तार (वय 32), नणंद शबनम अनिष मनियार (वय 40), सासू सलिमा ऊर्फ सायरा मेहबूब अत्तार (वय 60), दीर इम्रान मेहबूब अत्तार (वय 38, सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2016 ते 12 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत आरोपींनी आपआपसांत संगनमत करून फिर्यादी यांना मुलगी झाल्याने त्यांचा छळ करण्यात आला. तसेच पती आक्रम याला कामासाठी ऑस्ट्रोलिया व दुबई येथे जायचे असल्याने त्यासाठी माहेराहून सात तोळे सोन्याचे दागिने आणि 15 लाख रुपये आणावेत यासाठीही छळ करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड  करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.