BNR-HDR-TOP-Mobile

Chichwad : जयवंत विद्यालयात आरोग्याविषयी जागृती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या निमित्त भोईरनगर चिंचवड येथील नवप्रगती मित्र मंडळ आणि जयवंत बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भोईरनगर परिसरातील मुलींच्या शाळेतील आठवी आणि नववीतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना आरोग्याचे महत्व समजावून सांगत जनजागृती करण्यात आली. यावेळी नवप्रगती मित्र मंडळातर्फे सॅनिटरी नॅपकीनचे वाटप देखील करण्यात आले.

चिंचवड येथील जयवंत बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. कै. फकीरभाई पानसरे होमिओपॅथिक महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या वतीने आवश्यक व अनावश्यक आहार आणि आरोग्यासाठी सूचना व मासिकपाळी दरम्यान घ्यावयाची काळजी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन तसेच चर्चासत्र घेण्यात आले.

  • यावेळी मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन भोईर, मयूर पाटील, सागर मोरे, चिराग शिंगोटे, प्रशांत जाधव, जयवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील वंदना सावंत, जयश्री मोटे, शबाना शेख, शर्वरी आठले, नंदा डांगे, सुरेखा स्वामी, अजय रावत, राजेश पाटील, धनराज घुटाळ, हेमचंद्र भोळे, बसवेश्वर औरादे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना हर्षवर्धन भोईर म्हणाले, ‘नवप्रगती मित्र मंडळाच्या माध्यमातून यावर्षी नव्यानेच या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. मुली आणि महिला आरोग्याविषयी अपूर्ण माहितीमुळे याबाबतीत दुर्लक्ष करतात. विकसनशीन शहरात सर्व वयोगटातील स्त्रियांना त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या या गोष्टी संदर्भात संपूर्ण माहिती नाही हे वास्तव आहे. आणि ही चिंताजनक बाब आहे.

  • पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महिलादिनी महिलांना आरोग्यविषयी जागृतीसाठी प्रयत्न सुरू केला आहे. जयवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लवकरच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविणार असल्याचे हर्षवर्धन भोईर यांनी शेवटी बोलताना सांगितले.
HB_POST_END_FTR-A4

.