Chinchwad : जैन समाजाच्या बांधवानी घेतली मतदानाची शपथ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जैन समाजाच्या बांधवानी मोठ्या संख्येने मतदान करण्याची शपथ घेतली.

यामध्ये पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या भगवान महावीर जन्मोत्सव कार्यक्रमामध्ये मतदानाची शपथ घेतली. महासंघाचे अध्यक्ष विरेंद्र जैन, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष सुरेश गदिया, महामंत्री उमेश पाटील, कोषाध्यक्ष नेनसुख मंदोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.