Chichwad : पैसे न दिल्याने पत्नीवर चाकू हल्ला; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीने पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

कोमल रवींद्र पवार (वय 34) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 14) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रवींद्र भिकाजी पवार (वय 36, रा. संत ज्ञानेश्‍वर कॉलनी, संभाजीनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी (पती)चे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी कोमल यांचा मुलगा सार्थक हा घरीच होता. त्यावेळी आलेल्या पती रवींद्र याने कोमल यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

या कारणावरून चिडलेल्या पती रवींद्र याने पत्नीच्या भुवईजवळ, नाकावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांना जीवे मारेन आणि स्वतःही मरेन, अशी धमकी दिली. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.