Chichwad: ‘भावनेवर ताबा कसा मिळवावा’ यावर मंगळवारी व्याख्यान 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवारी (दि.2)’भावनेवर ताबा कसा मिळवावा’ या विषयावर इमोशनल वेलनेस कोच विवेक मंत्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 
चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात मंगळवारी चार ते सहा या वेळेत हे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रोत्साहित संगीत संध्यातर्फे निखील पटवर्धन यांचा सतार वादनाचा सांस्कृतिक  कार्यक्रम होणार आहे. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांना या व्याख्यानाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.