Chinchwad : सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व अविमम लायटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘गमतीशीर विज्ञान, विज्ञानातून गंमत’ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पेटंट नोंदणी प्रक्रियेची देखील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

चिंचवड येथील सायन्स पार्क मध्ये रविवारी (दि.13) पहिल्यांदाच मार्गदर्शक कार्यशाळा पार पडली. विद्यार्थी व पालकांचा या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला.

अविमम लाईटिंगचे मयूर वाघ यांनी एलईडी लाईट बनविण्याबाब आणि त्याचे पेटंट नोंदणी प्रकियेबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना एलईडी लाईट बनवल्याचे साहित्य विनाशुल्क देण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या लाईट सहभागी झालेल्यांना देण्यात आल्या. सायन्स पार्कतर्फे कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती सायन्स पार्कचे तांत्रिक अधिकारी लोणकर यांनी दिली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी सायन्स पार्कचे कुणाल जायसवाल, अंजली वर्टी, नेहा भोसले यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.