Chichwad News : 2024 ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीचाच असणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या झालेल्या मेळाव्यात येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड (Chichwad News) विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल, असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.

महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने थेरगाव येथे गुरुवारी (दि. 6) आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, नाना काटे, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, प्रवीण कदम, सुनिल गव्हाणे, रविकांत वर्पे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रविण कदम, विजय ओव्हाळ, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे,  विनोद नढे, संतोष कोकणे, माई काटे , माया बारणे, शितल  काटे, उषा वाघेरे, उषा  काळे, निकिता कदम, संगिता ताम्हाणे, राजेद्र साळुंखे, हरीभाऊ तिकोणे, इम्रान शेख, फजल शेख, युनुस कुरेशी, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, हरेश नखाते, माऊली सुर्यवंशी, विजय दर्शिले , संदीप पवार, रोमी संधू, सागर कोकणे, शाम जगताप,तानाजी जवळकर, सचिन काळे ,देवा नखाते  सर्व आजी माजी पदाधिकारी, निरिक्षक, महिला पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Maharashtra News : बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा ; घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती. जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराप्रती (Chichwad News) दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे  आभार मानणे हे देखील महाविकास आघाडीचे  कर्तव्य आहे, असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवाराने व्यक्त केले. नाना काटे यांनी सर्व  उपस्थितांचे व मतदारांचे आभार मानले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.