Chichwad News: ‘क्वीन्सटाऊन’चा उपक्रम, सोसायटीतच उभारला ‘आयसोलेशन वार्ड’

Chichwad News: 'Isolation Ward' set up in Queenstown Society या आयसोलेशन वार्डसाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची परवानगी घेण्यात आली असून जवळपास 40 बेडची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशनला लगत असलेल्या क्वीन्सटाऊन हाऊसिंग सोसायटीतच ‘आयसोलेशन वार्ड’ उभारण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयातील बेडची कमतरता लक्षात घेऊन हा ‘आयसोलेशन वार्ड’ उभारण्यात आला आहे. सोसायटी मधील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पण कोणतीच लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या ‘आयसोलेशन वार्ड’ मध्ये दाखल केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शहरात उपलब्ध बेडची संख्या कमी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात जम्बो कोविड सेंटरची उभारणी केली जात आहे.

मात्र, सोसायटीमधील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पण कोणतीच लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सोसायटीतच आयसोलेट करण्याची सुविधा निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून चिंचवड स्टेशन येथे लागून असलेल्या क्वीन्सटाऊन हाऊसिंग सोसायटीतच ‘आयसोलेशन वार्ड’ उभारण्यात आला आहे.

या आयसोलेशन वार्डसाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची परवानगी घेण्यात आली असून जवळपास 40 बेडची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला याच्यासाठी स्वतंत्र बेडचे वार्ड तयार करण्यात आले आहेत.

त्याच ठिकाणी रुग्णांच्या नाश्ता, जेवण, मनोरंजन व स्वच्छता गृहाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. येथील दाखल रुग्णांची वारंवार आरोग्य तपासणी केली जाणार त्यांच्यावर औषोधोपचार केले जाणार असून त्यांच्या सेवेसाठी एका डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे.

येथे दाखल केलेल्या रुग्णामध्ये जर गंभीर लक्षणे दिसून आली अथवा जास्त त्रास होऊ लागल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तसेच, 10 वर्षाखालील मुले, वृद्ध रूग्ण, गर्भवती महिला व अति जोखमीचे अजार असणाऱ्या रूग्णांना याठिकाणी दाखल केले जाणार नसल्याचे सोसायटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

क्वीन्सटाऊन सोसायटीतील ‘आयसोलेशन वार्ड’ बाबत डॉ. विजय सातव यांनी असे सांगितले की, सोसायटीतील कोरोना बाधित पण लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे. मात्र याठिकाणी दाखल होणे हा सर्वस्वी रुग्णाचा ऐच्छिक निर्णय असणार असून त्यासाठी त्यांना सहमती अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.