Chichwad : अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील अज्ञात दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

संगीता रोहिदास गवळी (वय 34, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे.

याबाबत आकाश रोहिदास गवळी (वय 19) यांनी सोमवारी (दि. 14) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्‍टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची आई संगिता ह्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने संगीता यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.