BNR-HDR-TOP-Mobile

Chichwad: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

316
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला असून रविवारी (दि.२४) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या ४६ वर्षीय आईने फिर्याद दिली असून महेश गपाट (रा. मंजुबा वसाहत, चिंचवडेनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आरोपी आणि पिडतीत एकमेकांच्या ओळखीचे होते. ओळखीचा फायदा घेऊन त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. डिसेंबर २०१८ पासून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला असता पीडितेच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.