Chichwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकांचे चिंचवड येथे संचलन

एमपीसी न्यूज – चिंचवड गाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 19 जानेवारी 2020) सायंकाळी 4.30 च्या सुमारास बाल स्वयंसेवकांचे पथ संचलन उत्साहात पार पडले. या संचलनात पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील एकूण 5 गटातून 21 नगरातून 10 ते 15 वयोगटातील एकूण 480 बाल स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

संचालनाला श्री मोरया गोसावी मंदिरातील देउळमळ्या पासून घोषपथकासह सुरुवात झाली. चिंचवड गावातून मार्गक्रमण करत चापेकर चौकातून पुन्हा देऊळमळ्यात समारोप झाला.

या पथसंचलनाने चिंचवड गावातील संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले व खूप चैतन्य निर्माण झाले. संचलन मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुले उधळून व फटाके वाजवून तसेच रांगोळ्या घालून तसेच रस्त्याचा दुतर्फा बहुसंख्येने उपस्थित राहून संचलनाचे उस्फुर्तपणे स्वागत केले.

संचलन समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिटा. मेजर जनरल जी. एन. नायर हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, संचलनात सहभागी बालकांनी संघात मिळणाऱ्या राष्ट्रभक्तीचे, शिस्तीचे, एकजुटीचे, सांघिक भावनेचे उत्कृष्ट दर्शन आज समाजाला घडवले. याप्रसंगी डॉ गिरीशजी आफळे, पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.