Chichwad : श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि पायल नृत्यालयच्या वतीने चिंचवड गावात शनिवारी नृत्यसभा

एमपीसी न्यूज – श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि पायल नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 27) नृत्यसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही नृत्यसभा चिंचवडगावातील श्रीराम मंदिरात सायंकाळी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नृत्यक्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमातून गुरुदक्षिणा देण्यात येणार आहे.

श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि पायल नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मागील एक वर्षापासून नृत्योन्मेष ही मासिक नृत्यसभा घेण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या तिस-या शनिवारी हे सभा घेतली जाते. शास्त्रीय नृत्यशैलीच्या एका नृत्यशैलीवर सादरीकरण करून तिचा अभ्यास या मासिक नृत्यसभेमध्ये करण्यात येतो. आजवर अनेक नर्तकांनी यामध्ये आपली नृत्यप्रस्तुती दिली आहे.

  • 27 जुलै रोजी महिन्याचा तिसरा शनिवार आहे. दरमहिन्याप्रमाणे या महिन्यात देखील नृत्यसभा घेण्यात येणार आहे. मात्र, जुलै महिन्यात गुरुपौर्णिमा असल्याने या मासिक नृत्यसभेत पायल गोखले यांना नृत्य सादरीकरणाची गुरुदक्षिणा देण्यात येणार आहे. यामध्ये मानसी, संगीता, तृप्ती, साक्षी, मुग्धा, स्वप्नाली, तोषवी, अक्षता आदींचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन अंबादास कहाणे हे करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.