Chichwad : जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल पळवला; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोर झोपलेल्या तरुणास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.

समीर दादासाहेब चोपडे (वय 17, रा. बिजलीनगर, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगार ज्ञान्या शिंदे (रा. बिजलीनगर, चिंचवड) यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी समीर गुरुवारी (दि. 17) रात्री घरासमोर झोपला होता. दरम्यान पहाटेच्या सुमारास आरोपी शिंदे याने त्याच्या खिशातील मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी समीरला जाग आल्याने शिंदे याने त्याला जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल पळवून नेला.

शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.