Chichwad : शरद पवार यांच्यावरील अक्षरचित्रांचे रविवारी प्रदर्शन; चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील कलाकार श्रुती गावडे हिने काढलेल्या 80 अक्षरचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी होत आहे.

चिंचवडमध्ये रविवारी (15 डिसेंबर रोजी) सकाळी 10.00 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती संयोजक अंशुल क्रिएशन्सचे विजय जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिली.

देशात प्रथमच प्रसिद्ध राजकीय व्यक्तीचे अशा प्रकारचे अक्षरचित्रांचे प्रदर्शन होत आहे. शरद पवार यांच्या नावापुढे जी विशेषणे आदराने व अभिमानाने लावली जातात. अशा अकल्पनिय, अफाट, अद्भुत, अजिंक्य, अजातशत्रू, करारी, कर्तृत्ववान, कष्टाळू, कर्मठ, कर्दनकाळ, खतरनाक, खमका, खणखणीत, खेळाडू, खेळीया, गतिमान, गहिवर, घमासान, घातक, चतुरस्त्र, चौफेर, चमत्कारिक, चळवळ, चिरतरुण, छावा, छातीठोक, छत्र, छबिदार, जिवलग, जिवंत, जिगरबाज, जिद्द, जेता, झंजावात, टोकदार, टस्सल, ठाणेदार, ठसनी, डोंगर, डरकाळी, ढाण्यावाघ, तलवार, तल्लख,तरुण, तगडा, तफडदार, थलैवा, दैदिपयमान दृष्टा, धडाकेबाज, धाक, धमक, ध्यैर्यवान, निर्णायक, निरंकार, पैलवान, पटाईत, प्रबळ, प्रेमळ पिता, फुत्कार, बेधडक, बिनधास्त, बेफिकीर, बुलंद, बाहुबली, भावूक, भारावलेला, भला, मजबूत, मेहनती, माणूस, मशाल, योगी, यत्न, यार, यातना, रांगडा, राही, राजामनाचा, ललकार, लक्षभेदी, वस्ताद, विचार, विज्ञानवादी, वैश्विक विद्यापीठ, शिकारी, शांत, शाही, संयमी, सहिष्णु, सत्कार, सदाचारी, हरफनमौला, हक्काचा, क्षत्रिय आणि ज्ञानी या ८० शब्दातून शरद पवार यांची ८० अक्षरचित्रे श्रुतीने रेखाटली आहेत.

अंशुल क्रिएशन हि संस्स्था व त्याचे प्रमुख विजय जगताप हे कला व कला विषयक उपक्रम राबविण्याचे काम शहरात करतात. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांची साथ व सहकार्य त्यासाठी लाभले आहे.

श्रुतीने यापूर्वी बीग बी अमिताभ बच्चन यांची ७७ अक्षरचित्रे त्यांच्या ७७ व्या वाढदिवशी तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले होते. श्रुतीची कला व तिचा दृष्टीकोन पाहून खासदार सुप्रिया सुळे या देखील आश्चर्यचकित झाल्या आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.