Chichwad : चिंचवडमध्ये रंगली ‘स्वररबहार दिवाळी पहाट’; रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – सोहम योग साधना आणि फोरम म्युझिक फाऊंडेशन आयोजित ‘दिवाळी पहाट स्वररबहार’ चिंचवडमध्ये रंगली. यामध्ये ‘अवघा रंग एक झाला’, ‘नयन तुजसाठी आतुरले’, ‘दिल चीज क्या है’ अशी विविध गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 25) हा गाण्यांचा कार्यक्रम रंगला. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंदराव देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रवी नामदे उपस्थित होते.

‘अवघा रंग एक झाला’, ‘नयन तुजसाठी आतुरले’, दयाधना, ‘दिल चीज क्या है, ‘ये मेरा दिल’, ‘यारा सिली सिली बिरहा की’, ‘एक अजनबी’ अशी एकापेक्षा एक सरस आणि सुरेल गीते सादर केली. आर्या फडतरे, वासुदेव केळकर, मृदुला कुलकर्णी, इशानी कुलकर्णी, सृष्टी जोशी, अक्षय घाणेकर यांनी यांच्या आवाजावर उपस्थित रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

राजेश झिरपे, वेदांत देवळे, वैभव केसकर, रोहन चिंचोरे, निषाध रिधये, ऋतुराज कोरे या वादकांनी साथसंगत केली. संगीत संयोजन मंदार दुमणे आणि निवेदन स्वाती देशपांडे यांनी केले. अनुजा उचगांवकर, दिगंबर उचगांवकर, सोहम उचगांवकर, रश्मी उचगांवकर-जाधव यांनी संयोजनात पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे यंदाचे हे 8 वे वर्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.