Chichwad : देवीच्या विविध आविष्कारांच्या चित्रमय प्रदर्शनाला सुरूवात; ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार

एमपीसी न्यूज – पेंटींग, रांगोळी, आर्ट ॲन्ड क्राफ्ट, चित्र आदीचे माध्यमातून देवीचे रूप प्रकट करणाऱ्या प्रदर्शनाला आजपासून सुरूवात झाली.येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.

अंशुल क्रिएशन, साईराज शिक्षण संस्था व जगद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

सांगवी येथील साई ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. आज पिंपरी-महानगरपालिकेचे वृक्षप्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे लहू गायकवाड यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.