Chichwad : दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून एक लाख 38 हजार ऐवजाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून तसेच सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली.

स्वप्निल मनोहर पाटील (वय 42, रा. आहेरनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पाटील यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून, लॅच लॉक उचकटून आतील एक लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.