Chichwad : चिंचवडला उद्या नृत्यांजली कार्यक्रम

एमपीसी न्य़ूज – नृत्यकला मंदिर आयोजित नृत्यांजली या भरतनाट्यमच्या विविध रचनांवर आधारीत शनिवारी, दि. २ फेब्रुवारीला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे, अशी माहिती नृत्यकला मंदिरच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी दिली.

गांधर्व कोर्स करणा-या विद्यार्थिनींचा आणि राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट नृत्यांगणांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड स्वर सागर संगीत महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, झी मराठीवरील ‘बाजी सिरिअल’ फेम आणि नर्तिका नुपुर दैठणकर उपस्थित राहणार आहेत. या नृत्यांजली कार्यक्रमात १२० जणीं नृत्य करणार आहेत.

गुरु तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमच्या विविध पारंपारिक रचना विद्यार्थिनी सादर करतील. तसेच त्यांना साथ संगत गायक प्रणाली जांभळे, वायोलिन संजय उपाध्याय, मृदुंग एच. व्यंकट रमन हे करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.