BNR-HDR-TOP-Mobile

Chichwad : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज आणि प्रतिभा जुनियर कॉलेज येथे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – 206 पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 2019 च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून SVEEP कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदान जागृती करणेकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेत येत आहेत. प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज आणि प्रतिभा जुनियर कॉलेज, चिंचवड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी आणि कर्मचारी यांना मतदान करणेबाबत आणि इतरांना मतदान करणेसाठी प्रवृत्त करण्याकामी मार्गदर्शन करुन शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमात सेक्रेटरी, डॉ.दिपक शाह, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य-डॉ.वनिता कु-हाडे, कार्यक्रम अधिकरी अरविंद बोरणे, डॉ.आनंद लुकंड पांडुरंग इंगळे आदी हजर होते. तसेच 100 टक्के मतदान होईल, यादृष्टिने सर्व मतदारांशी संपर्क साधून मतदानास प्रवृत्तव मतदानाचा हक्क बजवण्याबाबत प्रेरित करण्यासाठी सूचना SVEEP कक्ष प्रमुख सुनील वाघमारे मतदार नोंदणी अधिकारी 206 पिंपरी (अ.जा.)विधानसभा यांनी सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षकांना सूचना दिल्या. तसेच या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्खेने विद्यार्थी,शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सर्वांनी जोमाने कामकाज करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता योगदान देणेबाबत SVEEP कक्ष प्रमुख मुकेश कोळप यांनी सुचना देऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेली सभा संपल्याचे जाहिर केले. याकामी मार्गदर्शनाखाली मुकेश कोळप,तानाजी सावंत, सुशांत जोशी सहकारी मोठ्या संख्येने हजर होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3