Chinchwad : मोहननगर येथे पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पदयात्रा

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी मोहननगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये पार्थ यांच्या काकी शर्मिला पवार सहभागी झाल्या होत्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली.  मोहननगर -परिसरात घरोघरी प्रचार करून पार्थ पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पिंपरी विधानसभेचे माजीआमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद  शेट्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, डॉ. गणेश अबिके, आयुष निबाळकर, सचिन मोकाशी, पिंपरी विधानसभेचे संघटक किरण देशमुख, कामगार नेते महादेव नेर्लेकर,  निखिल दळवी, दिनेश पटेल, गोपी राठोड, आशा  शिंदे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, दीपाली देशमुख, प्रतीक इंगळे, प्रणल साबळे, शुभम चव्हाण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.