Chinchwad : रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री पावणेबाराच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ घडली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.

मयत व्यतीची अद्याप ओळख पटली नाही. वय अंदाजे 27 वर्ष असून रंग काळा सावळा आहे. उंची पाच फूट चार इंच, राखाडी शर्ट, राखाडी जरकीन आणि जीन्स पॅन्ट घातली आहे.
संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा,  असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.