Pune : खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल अंत्यदर्शन

एमपीसी न्यूज :  खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजारने निधन झालं आहे. 73 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.(Pune) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी .शनिवार पेठेतील निवासस्थानी ठेवण्यात आलं असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं.

खासदार गिरीश बापट यांच्या मागे पत्नी,मुलगा,सून आणि नात असा परिवार आहे. शनिवार पेठेतील निवासस्थानी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गिरीश बापट यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून साडे पाच वाजता अंत्ययात्रा काढण्यात आला आहे. गिरीश बापट यांचे अंत्यदर्शन घेण्यास शहरातील विविध भागातील नागरिकांनी गर्दी केली आहे.

PM Narendra Modi : भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते म्हणत गिरीश बापट यांना पंतप्रधान मोदीनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खासदार गिरीश बापट हे जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ राजकीय जीवनात सक्रिय होते.आमदार म्हणून विधिमंडळात काम करताना अनेक आठवणी आहेत.सभागृहात विरोधकांना शांत करण्याची एक वेगळीच कला त्यांच्यामध्ये होती. (Pune)तसेच त्यांनी पाश्चिम महाराष्ट्रात भाजप सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच काम केले.त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांना भेटण्याचा योग आला.त्यावेळी कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचे. हा मोलाचा सल्ला दिला असून यासह अनेक आठवणी आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

बापट साहेबांनी सर्व पक्षीय नेत्या सोबत सलोख्याचे संबध ठेवले : देवेंद्र फडणवीस

खासदार गिरीश बापट यांनी जवळपास पुणे शहराच नेतृत्व तीस वर्षांहून अधिक काळ केले.त्या दरम्यान त्यांनी विविध समाजातील नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्या सोबत सलोख्याचे संबध ठेवले.त्यामुळे त्यांचा राजकीय जीवनात कोणीही विरोधक नव्हता.तसेच विधिमंडळात काम करतेवेळी हसत खेळत केले.(Pune) यामुळे कधी विधिमंडळात वेळ कसा निघून जायचे समजत नसायचे,रात्री उशीरा झाला.तसेच आम्हाला बापट साहेब स्वतः जेवण तयार करून खाऊ घालायचे. यासह अनेक आठवणी असून आमच्या कुटुंबाची हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.