BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या चिंचवडमध्ये सभा तर भोसरीत रोड शो

एमपीसी न्यूज – विधानसभेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. चिंचवड मतदारसंघातील उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत सभा तर भोसरीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरीत रोड शो होणार आहे.

रहाटणीतील कापसे लॉन्स येथे सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. चिंचवडमधील भाजप-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. तर, भोसरीचे महायुतीचे महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता भोसरीतील पीएमटी चौकातून रोड शोला सुरुवात होणार आहे. भोसरी मतदारसंघात रोड शो काढण्यात येणार आहे. नागरिकांनी रोड-शो मध्ये आणि सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपने केले आहे.

Advertisement