Express Way Missing Link : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुरु असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली.

आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (6 लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (4 लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळयात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)

# मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या 5.86 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण होणार आहे.

# या प्रकल्पाची एकूण लांबी 19.80 किलोमीटर असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील 5.86 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करण्यात येत आहे.

# खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील 13.3 किलोमीटर राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधले जाणार आहेत.

# खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे 1.68 कि.मी. व 8.87 कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे 0.900 कि.मी. व 0.650 कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.

 

# या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे 19 कि.मी. चे अंतर 6 कि.मी. ने कमी होवून 13.3 कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.

# या प्रकल्पास 4 जून 2019 रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.

# या प्रकल्पास 24 ऑगस्ट 2018 रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

# या प्रकल्पांतर्गत पॅकेज 1 करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना 21 फेब्रुवारी 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

# या प्रकल्पांतर्गत पॅकेज 2 करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना 1 मार्च 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

# पॅकेज 1 व पॅकेज 2 चे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.

# या प्रकल्पाची एकूण किंमत 6695.37 कोटी रुपये इतकी आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये –

पॅकेज 1
# खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
# बोगदा क्र. 1 – 1.75 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
# बोगदा क्र.2 – 8.92 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
# बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे.
# मुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेज व्दारे जोडण्यात येत आहेत.

पॅकेज 2
# खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये 8 पदरी 2 व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे.
# व्हायाडक्ट क्र. 1 – 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल
# व्हायाडक्ट क्र. 2 – 650 मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल.
# 8 पदरीकरण – 5.86 कि.मी. खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट

प्रकल्प बांधकाम सद्यस्थिती

पॅकेज 1
# खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता
# बोगदा क्र. 2 एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे 1979 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे 1552 मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.
# बोगदा क्र. 2 ला जोडणाऱ्या अडिट नंबर 1 चे 1340 मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले असून नंबर 2 चे 1153 मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे.
# बोगदा क्र. 1 च्या पोर्टल पर्यंत पोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.

पॅकेज 2
# खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये 8 पदरी 2 व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे.
# सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे 8 पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या 8 पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. 1, 2 व 3 या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.
# व्हायाडक्ट क्र. 1 च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे.
# व्हायाडक्ट क्र. 2 च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.