CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर आमदारांनी बंड पुकारल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार बडखास्त होणार का असा राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कोणती भूमिका असेल हे जनतेसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (दि. 22 जून) संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा संदेश जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधून चालू घडामोडीमोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील असे संदेशात म्हटले आहे.

Ashadhi Palkhi 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचे स्वागत, महापालिकेकडून दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार पेटी भेट

राज्यातील अस्थिर झालेले सरकार पुन्हा सावरू शकेल का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर राजीनामा देणार का, फडणवीसांचे राज्य पुन्हा येणार का, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची काय भूमिका असणार असे एक ना अनेक प्रश्न जनतेसमोर उभे राहिले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.