Pune Ganeshotsav: मुख्यमंत्र्यांचा पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत संवाद

Chief Minister's interaction with dignitaries and presidents of major ganesh mandal in Pune श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

एमपीसी न्यूज- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत संवाद साधला. गणेशोत्सवाची परंपरा खंडित न करता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यावर्षी मिरवणूक न काढता 10 दिवस आरोग्याच्या दृष्टीने मंडळांनी काम करायला हवे, गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा करायचा याची मार्गदर्शक तत्वे ठरावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावर्षी कोरोना व पाऊस याला तोंड द्यावे लागणार आहे. घरातूनच गणरायाचे पूजन करावे. याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 5 आणि प्रमुख मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन जो निर्णय घेणार, त्याला आमचा पाठिंबा राहील, असे अशोक गोडसे यांनी सांगितले.

पुण्यातील इतर गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा करून एकत्रितपणे आणि निर्विघ्नपणे उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अण्णा थोरात म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर मंडळांचेही पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.