BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : मुख्यमंत्र्यांची मंगळवारी जाहीर सभा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षाचे मावळ विधान सभेचे उमेदवार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या मंगळवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे. ही सभा स्व. नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे,  अशी माहिती तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिली आहे.

यावेळी पुणे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, युवानेते रवींद्र भेगडे, मावळ तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे आदी मान्यवरांसह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, देहूरोड ग्रामीण भागातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.