chikhali News : चिखली-आकुर्डी रस्त्यावरील कचरा कुंडी हटविली; दुर्गंधीपासून स्थानिकांची सुटका

भाजप युवा नेते पांडुरंग तथा पांडा साने यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसीन्यूज  : चिखली – मोरेवस्ती भागातील पोलाईट हार्मनी सोसायटी समोरील चिखली-आकुर्डी रस्त्यालगतची कचराकुंडी हटविण्यात भाजप युवा नेते पांडुरंग तथा पांडा साने यांना यश आले आहे. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी कायमची दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

मोरेवस्ती येथे चिखली -आकुर्डी रस्त्यालगत पोलाईट हार्मनी सोसायटीसमोर जुनी कचराकुंडी होती. या कचराकुंडीमुळे येथे घाणीचे साम्राज आणि दुर्गंधी पसरलेली असायची. दिवसभर दुकानदार आणि नागरिक येथे कचरा टाकायचे. शिवाय रस्त्यावरून ये -जा करणारे वाहन चालकही या कुंडीत कचरा फेकायचे.

बहुतांश नागरिक लांबूनच कचरा फेकत असल्याने तो कचरा कुंडीत न पडतात आजूबाजूला तसेच रस्त्यावर पडत होता. त्यामुळे येथून जे-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. शिवाय काहीवेळा कचरा रस्त्यावर पसरलेला आढळून येत होता. एकूणच हा परिसर अतिशय बकाल बनला होता.

त्यामुळे संबंधित कचरा कुंडी अन्यत्र रहदारी नसलेल्या ठिकाणी हलविण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी होत असताना मुख्य रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याने ओसंडून वाहणारी कचरा कुंडी, तेथे मोकाट श्वानांचा वाढलेला वावर आणि त्यांचा परिसरातील नागरिकांना सहन करावा लागणारा रोजचा त्रास याबाबत भाजप युवा नेते पांडुरंग साने यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या.

त्यावर साने यांनी या तक्रारींची शहानिशा करुन संबंधित कचरा कुंडी अन्यत्र हलविण्याची मागणी महापालिका आरोग्य विभागाकडे लावून धरली होती.

अखेर काल ( गुरुवारी) ही कचरा कुंडी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटविली. सध्या त्या जागेवर कचरा टाकू नये; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सूचना फलक पांडुरंग साने यांच्यावतीने लावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.