BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्या तळीरामवर गुन्हा

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्या तरुणावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास कुदळवाडी येथे घडला.

गोरख पांडुरंग शिंगटे (वय 25, रा. कुदळवाडी, चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी गोरख हा मादक द्रव्याचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करीत होता. तसेच त्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून शांततेचा भंग केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.