Chikhali : दुकानातील 15 किलोची ताब्यांची वायर चोरली

एमपीसी न्यूज – तळेवडे येथील इलेक्‍ट्रॉनीक दुकानातून चोरट्यांनी 15 किलो वजनाची ताब्यांची वायर चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 4) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

विलास वामन महाजन (वय 50, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणीनगर येथे फिर्यादी यांचे इलेक्‍ट्रॉनीक सामानाचे दुकान आहे. त्यांनी रविवारी दुकान बंद केले असता रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे यावेळेत अज्ञाताने दुकानाचे कुलुप तोडून दुकानातील 5 हजार रुपये किंमतीची 15 किले वजनाची तांब्याची वायर चोरून नेली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.