Chikhali : चिखली येथे गुटख्यासह 17 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Chikhali) दरोडा विरोधीपथकाने चिखली पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 17 लाख रुपयांचा गुटखा जप्त करत तिघांना अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि.15) रात्री केली आहे.

 

शाकिर शब्बीर अन्सारी (वय 23 रा.गंजपेठ, पुणे), चाँद गुलाम शेख (वय 42 रा.पुणे),नफिज शरिफ अहमद अन्सारी (वय 34 रा.कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चिखली पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना एक मोपेड व टेम्पो पोलिसांच्या गाडीलापाहताच पाळून जाऊ लागले. पोलिसांना (Chikhali) त्यांच्या संशय येताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मोठ्या शितापीने तिघांनाही ताब्यात घेतले.

त्यांची तपासणी करताच एम.एच.14जी.टी.0504 मध्ये 28 पोत्यात 9 लाख 68 हजार 528 रुपयांचा गुटखा तसेच 4 लाख 43 हजार 500 रुपये रोख मिळून आले. पोलिसानी त्याच्याकडील गुटखा, रोख रक्कम व गाड्या असा एकूण 17 लाख 12 हजार 28 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : मुंबई-पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

 

हि कारवाई दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे, पोलीस अमंलदार राहूल खरगे, प्रविण माने, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, प्रशांत सैद, औदुंबर रोंगे तसेच चिखली पोलीस ठाण्याचे किसन वडेकर, शिंदे व घनवड यांचे पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.