Chikhali : कुदळवाडीतून 50 कामगार मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील मूळ गावी रवाना

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे कुदळवाडी चिखली भागात गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांना सर्व वाहतूक परवानगी घेऊन शुक्रवारी ( दि. ८) त्यांच्या मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील मूळ गावी पाठविण्यात आले. टाळ्यांच्या गजरात या मजूर बांधवांना निरोप देण्यात आला.

या कामी आमदार महेश लांडगे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पाठपुरावा केला होता.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पॉलिक्सचे सतीश माने यांनी बससमोर नारळ फोडून या कामगारांना निरोप दिला. दोन खासगी बसमधून एकूण 50  कामगार त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पहायला मिळाला, असे दिनेश यादव यांनी सांगितले.

बस रवाना होताना सर्वजण भावुक झाले होते. यावेळी चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर धनगर, बागुल साहेब, नरहरी बालघरे, गणेश यादव, किशोर लोंढे, प्रसाद मायभट्टे, राहुल कांबळे, काका शेळके आदी उपस्थित होते.

मानवतेवर आलेल्या कोरोनाच्या या संकटात चिखली-कुडाळवाडीत अडकून पडलेल्या मजुरांना स्थानिक जनतेच्या माणुसकीच दर्शन झाले. त्यामुळे मजुरांच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील कामगारांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.