Chikhali : चिखलीत 67 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चिखली गावात संतकृपानगर, रायगड कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली.

बाबासाहेब सोनबा मरगज (वय 45, रा. चिखलीगाव) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहा ते बुधवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान फिर्यादी मरगज यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.