Chikhali : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पान टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरी चालकाने पैसे मागितल्याचा रागातून तिघांनी मिळून टपरी चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 31) सायंकाळी सहाच्या सुमारास हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.

मोहम्मद शरीफ यारमोहम्मद खान (वय 30, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साहिद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान यांची हरगुडे वस्ती चिखली येथे सरोवर हॉटेलसमोर पान टपरी आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी साहिल त्याच्या दोन मित्रांसोबत खान यांच्या टपरीवर आला. त्याने खान यांच्याकडून सिगारेट घेतली.

त्यानंतर, खान यांनी साहिल याला सिगारेटचे पैसे मागितले. यावरून आरोपी साहिल याने खान यांना लाकडी दांडक्याने हातावर व डोक्यात मारले. तर त्याच्या दोन साथीदारांनी खान यांना लाथा बुक्क्यांनी मारून शिवीगाळ केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.