BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : दारूच्या नशेत गुन्हेगार मित्राने केला गुन्हेगार मित्राचा खून

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत एका गुन्हेगार मित्राने आपल्या गुन्हेगार मित्राचा दगडाने ठेचून खून केला. बालपणापासून असलेल्या मैत्रीचा असा भयानक शेवट झाला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली.

सनी मोहन घाटोळकर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रतीक ऊर्फ सोन्या संजय मोरे (वय 20, रा. प्रतीक नगर, चिखली) असे आरोपी मित्राचे नाव आहे. याप्रकरणी शुभम मोहन घाटोळकर (वय 26, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि सनी लहानपणापासून मित्र आहेत. बुधवारी ते एकमेकांसोबत होते. रात्री त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातूनच त्यांच्यामध्ये भांडण वाढले. प्रतीक याने सनी याला खाली पाडले. त्याच्या डोक्यात दगडाने मारले. यामध्ये सनी गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रतीक आणि सनी यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर प्रतीक फरार झाला आहे. चिखली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.