-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali : ‘तू फक्त हो म्हण….’ असे म्हणत महिलेचा विनयभंग करणा-या तरुणाला अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला सोडायला तयार आहे’ असे म्हणून महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. हा प्रकार मोरेवस्ती चिखली, देहूरोड, तळवडे इत्यादी ठिकाणी घडला आहे.

प्रवीण बाळासाहेब गायकवाड (वय 28, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. वेळोवेळी जवळीक साधण्यासाठी महिलेला रस्त्यात थांबवून मारण्याची धमकी देत नाहक त्रास दिला. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास मुलाला क्लासला सोडून दुचाकीवरून एकट्या जात होत्या.

महिलेला पाहिल्यानंतर आरोपीने महिलेला थांबवले. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी तू बोलत जा. मला तू पाहिजे आहे’. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला सोडायला तयार आहे. तू फक्त हो म्हण’ असे म्हणत त्याने महिलेशी गैरवर्तन केले. याबाबत महिलेने गुरुवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.