Chikhali : हात ऊसने घेतलेल्या पैशांच्या वादातून मित्रावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – तीन महिन्यांपूर्वी मित्राकडून 1 हजार 600 रुपये हात उसने घेतले. या पैशाच्या कारणावरून पैसे देणा-या मित्राने पैसे घेणाऱ्या मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना सात मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास म्हेत्रे गार्डन मागे, चिखली येथे घडली.

राज राहुल शंकरगुप्ता (वय 19 रा. अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 11) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन पंडित (रा. चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज हे फुगे डेकोरेट करण्याचे काम करतात. मागील तीन महिन्यांपूर्वी राज यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी त्यांचा मित्र रोहन यांच्याकडून 1 हजार 600 रुपये हात उसने घेतले.

सात मे रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास आरोपी रोहन याने राज यांना म्हेत्रे गार्डनच्या मागे बोलावून घेतले. राज गार्डनच्या मागे गेले असता रोहन एका मिनिटात येतो असे सांगून घरी गेला. त्यावेळी फिर्यादी राज आणि त्यांचा दुसरा मित्र धीरज गायकवाड हे बोलतो थांबले.

काही वेळानंतर आरोपी रोहन अचानक राज यांच्या पाठीमागून आला आणि त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.