Chikhali : घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह कार पळवली

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील चार लाख 81 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. तसेच चारचाकी कार देखील पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी साडेअकरा ते मंगळवारी (दि. 31) पहाटे साडेतीनच्या दरम्यान पुर्णानगर, चिंचवड येथे ही घटना घडली.

अतिष सुग्रीव ओहळ (वय 36, रा. पुर्णानगर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओहळ शनिवारी सकाळी त्यांच्या मुळगावी गेले. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून लॅच उचकटून घरात प्रवेश केला. घरातून चार लाख 81 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच ओहळ यांची कार चोरून नेली. फिर्यादी ओहळ राहत असलेल्या बिल्डिंगमधील शैलेश महादेव थिटे यांच्या घराच्या दरवाजाचा लॅच उचकटून चोरी करण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.