Chikhali : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

Chikhali: A youth who went for swimming drowned in Indrayani river

एमपीसी न्यूज – पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोधमोहीम राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली आहे.

गणेश लींगाप्पा नाईक (वय अंदाजे 25, रा. चीमनोर, ता. स्व रबा, जि. शुमग, कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बग वस्ती, चिखली येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेला एक व्यक्ती बुडाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला रात्री उशिरा मिळाली. मात्र, रात्री नदीपात्रात तांत्रिक कारणांमुळे शोधमोहीम राबवता आली नाही.

त्यामुळे पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्य आणि चिखली, तळवडे या उपकेंद्राचे जवान रविवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी रबरी बोटीच्या साहाय्याने चार तास सर्च ऑपरेशन करून गणेश नाईक यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.