Chikhali : संचारबंदीत अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असताना चिखलीतून एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञातांकडून करण्यात आले.   ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी 11 ते रविवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी तिच्या 38 वर्षीय वडिलांनी रविवारी (दि. 5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून अज्ञातांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत  महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.