Chikhali : मित्राचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला अखेर साताऱ्यातून अटक

एमपीसी न्यूज – मित्राची परिसरात प्रतिष्ठा वाढू (Chikhali ) लागल्याच्या कारणावरून मित्राने त्याच्या अल्पवयीन साथीदारासोबत मिळून गोळ्या झाडून मित्राचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 22) चिखली येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.

सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे (वय 23, रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड. मूळ रा. कासारमळा, पानसरेवाडी, सुपा, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा उर्फ सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिखली गाव येथे कृष्णा उर्फ सोन्या तापकीर या तरुणाचा खून झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर दिवसा गोळीबार करून सोन्या तापकीर याचा खून केला. घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दोन पथके तयार केली. या (Chikhali ) पथकांनी चिखली, पुनावळे, मोईगाव, यवत, सुपा या भागात आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळा या गावामध्ये आरोपी सौरभ पानसरे आहे. त्यानुसार पोलिसांनी सरताळा येथील एका कॅनल लगत सापळा लावला.

Pune : जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही

तिथे दुचाकीवरून संशयित आरोपी आल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी सौरभ पानसरे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक इमरान शेख, पोलीस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.