Chikhali: अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने चिखली, जाधववाडीतील अनधिकृत पत्राशेडवर आज (मंगळवारी) कारवाई केली. 

‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक दोनमधील चिखली, जाधववाडी परिसरात अनधिकृतपणे पत्राशेड थाटली होती. या पत्राशेडवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. त्यामध्ये आहेर चौक ते विसावा चौक, जाधववाडी, चिखलीतील दोन अनधिकृत पत्राशेड, बांधकामावर (क्षेत्रफळ अंदाजे 1585 चौरस फुट) कारवाई करण्यात आली.

दोन जेसीबी, मजूर यांच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.