Chikhali : साईदर्शन सहकारी गृहरचना संस्थेवर प्रशासकाची नेमणूक

एमपीसी न्यूज – मोरेवस्ती चिखली येथील साई दर्शन सहकारी गृहरचना संस्थेवर प्रशासक म्हणून प्रामाणित लेखापरीक्षक सतीश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साई दर्शन संस्थेच्या संचालक मंडळाने शासकीय नियमानुसार कामकाज न केल्याने उपनिबंधक कार्यालयाने वरील आदेश काढले आहेत.

साई दर्शन सोसायटीमधील रहिवासी धनंजय मोरे यांनी याबाबत माहिती दिली. साई दर्शन सोसायटीमधील संचालक मंडळ मनमानी कारभार करत होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड ठेवले नाही.

  • सोसायटीचे सर्व व्यवहार बँकेमार्फत व्हायला हवेत, मात्र संचालक मंडळाने पैसे स्वतःजवळ ठेऊन त्याचा विनोयोग केला आहे. सोसायटीचे आजवर ऑडिट झाले नाही. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून तरीही निवडणूक घेण्यात आलेली नाही. याबाबत उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली.

याबाबत सहकारी संस्था पुणे शहर उपनिबंधक उज्वला माळशिकारे यांनी या संस्थेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला आहे. सतीश कांबळे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कांबळे यांनी प्रशासक पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचेही आदेशात म्हटले आहे. तसेच कांबळे यांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल प्रत्येक महिन्याला उपनिबंधक कार्यालयास सादर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.