Chikhali : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल विभागाच्या अखिल भारतीय बैठकीला प्रारंभ

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल विभागाची दोन दिवसीय अखिल भारतीय बैठकीला शनिवार (दि.22) चिखली येथे सुरूवात झाली. बैठकीसाठी बजरंग दलाचे देशातील ४४ प्रांतातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहीले आहेत. ही बैठक दोन दिवसीय असून रविवार (दि. २३) संध्याकाळी पाच वाजता बैठकीची सांगता होणार आहे.

यावेळी बैठकीला संबोधित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री विनायक देशपांडे, इस्कॉन या संस्थेचे प्रभुजी वैष्णव दास, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

मिलिंदजी परांडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले “CAA संबंधित समाजात जागृती आणि संबंधिताकडून फॉर्म भरण्याची प्रक्रिया योजना पूर्वक पूर्ण घेतली पाहिजे. तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर २५ मार्च (वर्षप्रतिपदा) ते ८ एप्रिल (हनुमान जयंतीपर्यंत) भव्य रथयात्रांचे आयोजन करून देशभरात दोन लाख स्थानापर्यंत रामोत्सव करण्याचा निश्चय केला आहे. ५०० वर्षांचा कलंक धुवून हिंदू समाजाने जे ठरविले तेच केले याचा हा विजयोत्सव असल्याचे ते म्हाणाले.

उदघाटन कार्यक्रमला आमदार महेश लांडगे, गणेश इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक एस. बी. पाटील, मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, प्रांत कोषाध्यक्ष सीए महेंद्र देवी, प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे, विहिंप, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.