Chikhali : मोबाइलवर आलेल्या लिंकवर माहिती दिल्याने पावणे दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – गुगल पे समजून गुगल प्ले स्टोअरवर एक हजार रुपये पाठविले. त्यानंतर तीन मोबाइल क्रमांकांवरून आलेल्या लिंकवर माहिती दिल्याने तीन बँकांच्या खात्यातून एक लाख 76 हजार 200 रुपये डेबिट करून फसवणूक केली. हा प्रकार तळवडे येथे 5 ते 10 जानेवारी दरम्यान घडला असून याबाबत 30 जानेवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्लेश चंद्रकांत कुंभार (वय 38, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी गुगल पे समजून गुगल प्ले स्टोअरवर एक हजार रुपये पाठविले. त्यानंतर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या मोबाइलवर लिंक आली. त्यावर फिर्यादी यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या एका बँकेच्या खात्यातून पाच वेळा 20 हजार याप्रमाणे एक लाख रुपये काढण्यात आले. तसेच दुस-या बँकेच्या खात्यातून 50 हजार रुपये काढण्यात आले. तर तिस-या बँकेच्या खात्यातून 26 हजार 200 रुपये डेकाढण्यात आले. तीन बँकांच्या खात्यातून एकूण एक लाख 76 हजार 200 रुपये काढून फिर्यादी यांची फसवणूक झाली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like